ध्येय आणि उद्देश

ध्येय आणि उद्देश‌

मुख्यपान‌ > ध्येय आणि उद्देश‌

  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या सर्वागीण विकासाचे उद्दिष्ट्य साध्य करणेसाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी होणे त्याकरीता राज्यातील लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संस्थाच्या निवडणूका संघटनेच्या माध्यमातून तसेच संघटनेच्या चिन्हावर लढविणे, योग्य व पात्र उमेवार निवडणूकीसाठी उभे करणे

  • महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांना संघटीत करणे. त्यांच्या मुलभुत प्रश्नाबाबत तसेच त्यांचे हक्क व कर्तव्याबाबत जागरुकता निर्माण करणे. त्यांच्या मुलभुत प्रश्नाबाबत तसेच त्यांचे हक्क व कर्तव्याबाबत जागरुकता निर्माण करणे. भारतीय संविधान, समाजवाद, धर्मनिरपेक्षा, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही या तत्वाप्रणालीचे रक्षण करणे व त्यानुसार संघटनेचे कामकाज करणे.

  • महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा आराखडा बनविणे. त्यावर आधारीत निवडणूक जाहीरनामा बनविणे आणि निवडुन आलेल्या सदस्यांच्या माध्यमातुन जाहिरनाम्याची तसेच ठरविलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करणे

  • संघटनेच्या माध्यमातुन नागरिकांचे राजकीय तसेच सामाजिक प्रबोधन करणे, त्यासाठी शिबिरे, मेळावे, सभा‍ संमेलने भरविणे.

  • महाराष्ट्र राज्यातील नागरीकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न करणे

  • महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक असा सर्वागिण विकास करणे

  • संघटनेच्या माध्यमातुन सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्यासाठी शिबिरांचे व मेळाव्यांचे आयोजन करणे व त्यामधुन आरोग्यविषयी इलाज व औषधोपचार करणे

  • संघटणेच्या माध्यमातुन शैक्षणिक विकासासाठी शैक्षणिक संस्था उभारणे व त्या चालविणे

  • नागरिकांमधील अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, समाविघातक यांचे निर्मूलन करणेसाठी विविध उपक्रम राबविणे

  • संघटनेच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यातील व्यक्तिना जबाबदार नागरिक म्हणुन घडविणे

  • समाजातील विविध घटकांच्या हितासाठी,कल्याणासाठी व उन्नतीसाठी विविध उपक्रम हाती घेणे