मुख्यपान‌

slide-0
slide-2
slide-1
slide-3
PlayPause
previous arrow
next arrow

लोकसेवा विकास आघाडी प्रवर्तक‌

मान‌.श्री.भानुदास मुरकुटे

माजी आमदार, श्रीरामपुर‌
(चार्टर्ड अकाऊंटंट)

अध्यक्ष मनोगत

नमस्कार, सध्याची राजकीय स्थिती खूप गुंतागुंतीची झालेली आहे. यामुळे विकासाचे प्रश्न मागे पडतात. यासाठी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या संकल्पनेतून विधानसभा मतदार संघासाठी स्वतःचे हक्काचे राजकीय व्यासपीठ असावेे, यातून लोकसेवा विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. लोकसेवा विकास आघाडी हि राज्य निवडणुक आयोगाकडे नोंदणीकृत आहे. या माध्यमातून ग्रामपंचायत, विविध कार्यकरी सेवा संस्था, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढविल्या जातात. तसेच शेतकरी मेळावा, युवक मेळावा, महिला मेळावा, मार्गदर्शन शिबीरे, विविध प्रशिक्षण शिबीरे, शेती-पाटपाणी-वीज प्रश्नावर आंदोलने करुन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. लोकसेवा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लोकसेवा विकास आघाडीचे प्रवर्तक माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा असते. लोकसेवा विकास आघाडी आपले ध्येय व उद्दिष्ट साध्य करील तसेच जनहिताचे कार्य करील, अशी मी ग्वाही देतो.

हिम्मतराव माधवराव धुमाळ

अध्यक्ष, लोकसेवा विकास आघाडी

उपक्रम फोटो गॅलरी